सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

आपली सौरमाला , बुध

// बुध \\



मित्रांनो आपल्यातील अनेकांना जन्मपत्रिकेतील ग्रहांबद्दल खुप ऊत्सुकता असते कारण ज्योतिषशास्त्रानुसार त्या ग्रहांचा आपल्यावर प्रभाव पडतो त्याबद्दल अनेक मतमतांतर आहेत ते असो पण त्या ग्रह-गोलांचा एकमेकांवर कसा प्रभाव पडतो त्या बिचार्यांना (ग्रहांना) काय काय झेलावे लागते तुम्हाला माहिती आहे का ? चला तर मग आज सुरूवात करूया सौरमालेतील पहिल्या म्हणजेच सुर्याच्या सर्वात जवळ असणार्या बुध ग्रहापासून आणि जाणून घेऊयात त्याच्याबद्दलच्या काहि रहस्यमयी,चित्तवेधक आणि मनोरंजक गोष्टी!

* गुरूचा चंद्र ग्यानमेड हा सौरमालेतील सर्वात विशाल चंद्र आहे ह्याचा  आकार बुध ग्रहाहूनहि मोठा आहे आणि स्वत:चे चुंबकीय क्षेत्र असणारा हा मानवाच्या.माहितीतला एकमेव चंद्र आहे.



* सुर्याच्या दिवस रात्रीच्या तापमानात जमीन-अस्मानाचे अंतर असते. बुधाच्या सुर्याकडे तोंड असलेल्या बाजुचे तापमान 430°c तर सुर्याकडे पाठ फिरवलेल्या भागाचे तापमान -140°c ईतके असते.

* बुध आणि शुक्र  ह्या विशाल अंतराळात   खर्या अर्थाने एकाकी ग्रह आहेत कारण  त्यांच्याजवळ  स्वत:चा  चंद्र नसतो.

* बुध ग्रहाचे गुरूत्वाकर्षण खुप कमी असते.

* सुर्याभोवतीच्या एका परिभ्रमणात बुध दोनदा सुर्याच्या खुप जवळ येऊन त्याचा ( परिभ्रमणाचा ) वेग ईतका वाढतो की सुर्य आकाशात मागच्या दिशेत जातोय की काय असा आभास निर्माण होतो.

* बुध  ग्रहाचा सुर्याभोवती फिरण्याचा वेग सौरमालेत सर्वाधिक असल्याने  त्या ग्रहावरील एक  वर्षहि  सौरमालेतील  सर्वात छोटे म्हणजेच   फक्त 88 दिवस ईतकेच असते.  त्याचवेळेस त्या 88 दिवसांमधील 59 दिवस बुध ग्रहावर सुर्य तळपत असतो.






* पृथ्वीची कोअर 32% आयर्न आणि निकेल ह्या धातुंनी बनलेली असते त्याचवेळेस वैज्ञानिकांमते बुध ग्रहामध्ये हेच प्रमाण 80% असावे.

* मित्रांनो बुध ग्रह आणि मौत का कुआंमधल्या बाईकस्वाराचा आपापसात काय संबंध असतो माहित आहे ?
ते  दोघेहि जीवानीशी पळत असतात मृत्युच्या दरीत पडण्यापासून वाचण्यासाठी !  आणि त्या दोघांना वाचवते  "एस्केप व्हिलॉसिटी!"

मित्रांनो हि एस्केप व्हिलॉसिटी एक कमालीची गोष्ट आहे. एस्केप व्हिलॉसिटी म्हणजे गुरूत्वाकर्षणाच्या कचाट्यातुन वाचवणारा वेग किंवा बळ.  गुरूत्वाकर्षण आत खेचते आणि हे बळ बाहेर ढकलते म्हणूनच एस्केप व्हिलॉसिटी अवलंबुन असते गुरूत्वाकर्षणावर  जेव्हढे  गुरूत्वाकर्षण अधिक तेव्हढिच  त्यापासून सुटण्यासाठीची  एस्केप व्हिलॉसिटीहि अधिक !
ह्या कारणामुळेच  सौरमालेतील सर्व ग्रहांपेक्षा बुध ग्रहाचा सुर्याभोवती फिरण्याचा वेग सर्वाधिक असतो तसे न केल्यास तो पडेल डायरेक्ट सुर्यमुखात !
आणि नेमक ह्याऊलट सुर्यापासून खुप दूर असणारा  प्ल्युटो  मात्र बुध ग्रहाहून खुप खुप कमी वेगाने पळतो
पण  मित्रांनो प्ल्युटोने बुधाप्रमाणे  "सबसे तेज"  होण्याचा प्रयत्न केल्यास काय होईल माहितेय ?
त्या वेगामुळे त्यातील एस्केप व्हिलॉसीटी तिथल्या आधीच क्षीण गुरूत्वाकर्षणाहून वरचढ ठरून तीचे बळ  प्ल्युटोला लाथ मारलेल्या फुटबॉलप्रमाणे  सौरमालेहून दूर अंतराळात  फेकून  देईल आणि  एखाद्या  पोरक्या मुलाप्रमाणे प्ल्युटो  अंतराळाच्या अंधारात  भरकटून  हरवून जाईल.

म्हणून  ईथे टिकुन रहाण्यासाठी  आवश्यक असते एस्केप व्हिलॉसिटी आणि  गुरूत्वाकर्षणामधील संतुलन !ह्या संतुलनामुळेच ऊपग्रह , ग्रह तारे आणि आकाशगंगा आपापल्या जागी टिकू शकल्या ज्यामुळे  हे विश्व आणि आपण घडलो पण मजेशीर गोष्ट हि की   केवळ आणि केवळ  हे संतुलन तोडल्यामुळेच   आजचा प्रगत  मानव  घडला.
कारण ह्या एस्केप  व्हिलॉसिटीच्या सहायानेच  पृथ्वीच्या पाशातुन मुक्त होऊन  दूर अंतराळात भरारी  घेऊन  मानवाने  चंद्र आणि मंगळाच्या भुमीवर आपला ठसा ऊमटवलाच पण केवळ त्याचमुळे हि हजारो सॅटलाईट्स अंतराळात पोहोचुन दूरचित्रवाणी , फोनपासून ईंटरनेटपर्यंत हि आजची सर्व प्रगती शक्य झाली.  " माणूस  अंतराळात जाण्याचा  कोणाला  काय फायदा ?  ह्या सर्व बिनडोक , खार्चिक  वायफळ गोष्टी आहेत " असे म्हणणारे खुप खुप  विरोधक  तेंव्हा  होते  पण  त्यांच्या विरोधाने सर्व प्रयत्न सोडून देऊन  माणूस गुरूत्वाकर्षणाचे बंधन तोडूच शकला नसता तर ?
मित्रांनो तर  आपण आजहि बाबा आदम युगात असतो.

- मकरंद सुधाकर पाटोळे.