सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

आपली सौरमाला , बुध

// बुध \\



मित्रांनो आपल्यातील अनेकांना जन्मपत्रिकेतील ग्रहांबद्दल खुप ऊत्सुकता असते कारण ज्योतिषशास्त्रानुसार त्या ग्रहांचा आपल्यावर प्रभाव पडतो त्याबद्दल अनेक मतमतांतर आहेत ते असो पण त्या ग्रह-गोलांचा एकमेकांवर कसा प्रभाव पडतो त्या बिचार्यांना (ग्रहांना) काय काय झेलावे लागते तुम्हाला माहिती आहे का ? चला तर मग आज सुरूवात करूया सौरमालेतील पहिल्या म्हणजेच सुर्याच्या सर्वात जवळ असणार्या बुध ग्रहापासून आणि जाणून घेऊयात त्याच्याबद्दलच्या काहि रहस्यमयी,चित्तवेधक आणि मनोरंजक गोष्टी!

* गुरूचा चंद्र ग्यानमेड हा सौरमालेतील सर्वात विशाल चंद्र आहे ह्याचा  आकार बुध ग्रहाहूनहि मोठा आहे आणि स्वत:चे चुंबकीय क्षेत्र असणारा हा मानवाच्या.माहितीतला एकमेव चंद्र आहे.



* सुर्याच्या दिवस रात्रीच्या तापमानात जमीन-अस्मानाचे अंतर असते. बुधाच्या सुर्याकडे तोंड असलेल्या बाजुचे तापमान 430°c तर सुर्याकडे पाठ फिरवलेल्या भागाचे तापमान -140°c ईतके असते.

* बुध आणि शुक्र  ह्या विशाल अंतराळात   खर्या अर्थाने एकाकी ग्रह आहेत कारण  त्यांच्याजवळ  स्वत:चा  चंद्र नसतो.

* बुध ग्रहाचे गुरूत्वाकर्षण खुप कमी असते.

* सुर्याभोवतीच्या एका परिभ्रमणात बुध दोनदा सुर्याच्या खुप जवळ येऊन त्याचा ( परिभ्रमणाचा ) वेग ईतका वाढतो की सुर्य आकाशात मागच्या दिशेत जातोय की काय असा आभास निर्माण होतो.

* बुध  ग्रहाचा सुर्याभोवती फिरण्याचा वेग सौरमालेत सर्वाधिक असल्याने  त्या ग्रहावरील एक  वर्षहि  सौरमालेतील  सर्वात छोटे म्हणजेच   फक्त 88 दिवस ईतकेच असते.  त्याचवेळेस त्या 88 दिवसांमधील 59 दिवस बुध ग्रहावर सुर्य तळपत असतो.






* पृथ्वीची कोअर 32% आयर्न आणि निकेल ह्या धातुंनी बनलेली असते त्याचवेळेस वैज्ञानिकांमते बुध ग्रहामध्ये हेच प्रमाण 80% असावे.

* मित्रांनो बुध ग्रह आणि मौत का कुआंमधल्या बाईकस्वाराचा आपापसात काय संबंध असतो माहित आहे ?
ते  दोघेहि जीवानीशी पळत असतात मृत्युच्या दरीत पडण्यापासून वाचण्यासाठी !  आणि त्या दोघांना वाचवते  "एस्केप व्हिलॉसिटी!"

मित्रांनो हि एस्केप व्हिलॉसिटी एक कमालीची गोष्ट आहे. एस्केप व्हिलॉसिटी म्हणजे गुरूत्वाकर्षणाच्या कचाट्यातुन वाचवणारा वेग किंवा बळ.  गुरूत्वाकर्षण आत खेचते आणि हे बळ बाहेर ढकलते म्हणूनच एस्केप व्हिलॉसिटी अवलंबुन असते गुरूत्वाकर्षणावर  जेव्हढे  गुरूत्वाकर्षण अधिक तेव्हढिच  त्यापासून सुटण्यासाठीची  एस्केप व्हिलॉसिटीहि अधिक !
ह्या कारणामुळेच  सौरमालेतील सर्व ग्रहांपेक्षा बुध ग्रहाचा सुर्याभोवती फिरण्याचा वेग सर्वाधिक असतो तसे न केल्यास तो पडेल डायरेक्ट सुर्यमुखात !
आणि नेमक ह्याऊलट सुर्यापासून खुप दूर असणारा  प्ल्युटो  मात्र बुध ग्रहाहून खुप खुप कमी वेगाने पळतो
पण  मित्रांनो प्ल्युटोने बुधाप्रमाणे  "सबसे तेज"  होण्याचा प्रयत्न केल्यास काय होईल माहितेय ?
त्या वेगामुळे त्यातील एस्केप व्हिलॉसीटी तिथल्या आधीच क्षीण गुरूत्वाकर्षणाहून वरचढ ठरून तीचे बळ  प्ल्युटोला लाथ मारलेल्या फुटबॉलप्रमाणे  सौरमालेहून दूर अंतराळात  फेकून  देईल आणि  एखाद्या  पोरक्या मुलाप्रमाणे प्ल्युटो  अंतराळाच्या अंधारात  भरकटून  हरवून जाईल.

म्हणून  ईथे टिकुन रहाण्यासाठी  आवश्यक असते एस्केप व्हिलॉसिटी आणि  गुरूत्वाकर्षणामधील संतुलन !ह्या संतुलनामुळेच ऊपग्रह , ग्रह तारे आणि आकाशगंगा आपापल्या जागी टिकू शकल्या ज्यामुळे  हे विश्व आणि आपण घडलो पण मजेशीर गोष्ट हि की   केवळ आणि केवळ  हे संतुलन तोडल्यामुळेच   आजचा प्रगत  मानव  घडला.
कारण ह्या एस्केप  व्हिलॉसिटीच्या सहायानेच  पृथ्वीच्या पाशातुन मुक्त होऊन  दूर अंतराळात भरारी  घेऊन  मानवाने  चंद्र आणि मंगळाच्या भुमीवर आपला ठसा ऊमटवलाच पण केवळ त्याचमुळे हि हजारो सॅटलाईट्स अंतराळात पोहोचुन दूरचित्रवाणी , फोनपासून ईंटरनेटपर्यंत हि आजची सर्व प्रगती शक्य झाली.  " माणूस  अंतराळात जाण्याचा  कोणाला  काय फायदा ?  ह्या सर्व बिनडोक , खार्चिक  वायफळ गोष्टी आहेत " असे म्हणणारे खुप खुप  विरोधक  तेंव्हा  होते  पण  त्यांच्या विरोधाने सर्व प्रयत्न सोडून देऊन  माणूस गुरूत्वाकर्षणाचे बंधन तोडूच शकला नसता तर ?
मित्रांनो तर  आपण आजहि बाबा आदम युगात असतो.

- मकरंद सुधाकर पाटोळे.

रविवार, १७ जुलै, २०१६





काय  मित्रांनो  माझ्या  शुक्रवारच्या   लेखानंतर  तुम्ही  " ब्रम्हांड " चॅनलवर  आपल्या  पुर्वजांच्या  बारश्याचे  सिग्नल्स  पाहिलेत  की  नाहि ?   काय  म्हणता  केबल आणि  डिशची  वायर  काढल्यावर  काय  दिसणार  डोंबल ?
 😉

अहो  मित्रांनो

 ते  डोंबलच

तर

आपल्या  सर्वांच  💰 भांडवल !

हो  तोच   टि.व्हीचा  ब्लॅंक   स्क्रीन  ज्यावर  मुंग्यांसारखे  छोटे  छोटे   डॉट्स  पळत  असतात  काहि  जण  त्याला  पाऊस  म्हणतात  तर  कुणी  म्हणत  मुंग्या.   पण  असा  स्क्रिन  दिसताक्षणी  आपल्या  "मॅडबॉक्सचे"  📺 सिग्नल्स  नसल्याने संतापुन  चरफडत  जाऊन  आपण  टि.व्ही  बंद  करतो. पण  मित्रांनो  त्यावेळीहि  आपल्या   टि.व्हीला   सिग्नल  मिळत  असतात विश्वातले   सर्वात   शक्तीशाली  सिग्नल्स   जे  24/7  कुठल्याहि  व्यत्ययाविना  सुरू  रहातात .  मग  भलेहि  बाहेर   पाऊस , वारा ,  चक्रीवादळ  किंवा  अगदि  🚀युध्द  काहिहि  सुरू  असो.  हे  सिग्नल्स  पकडण्यासाठी   न  आपल्याला  📡  ॲडजस्ट   करण्याची   गरज  पडते   न  गच्चीची !   ईतकच  कश्याला  कुठल्याहि  ॲंटिनाशिवाय    जमिनीत  कित्येक  कि.मी.  खोल  गुहेतहि  हे  सिग्नल्स  आपल्याला   मिळतील  जे  ब्रम्हांडातुन  चहुबाजुने  आपल्या  दिशेत  येत  असतात  आणि  ज्यांना  टि.व्हीवर  आपण  धावत्या  मुंग्या  म्हणतो
  आणि  FM📻   सिग्नल्स  आपल्याला  खरर्रर्र...................!
 अश्या  आवाजाच्या  रूपात  ऐकु  येतात.    मित्रांनो  भलेहि  सर्वसामान्यांसाठी  टि.व्ही - रेडिओवरील   त्या  सिग्नल्सचा   अर्थ  " ईथे  काहिहि  नाहि " असा  असला  तरीहि  "त्याच"  सिग्नल्समुळे  ईथे   सर्व काहि  आहे.   मी , तुम्ही , सर्व  सजीवसृष्टी , सर्व  ग्रहगोल ,  तारे  !
कारण  ते  सिग्नल्स  आहेत  आज  अस्तित्वात  असलेल्या  ब्रम्हांडाच्या  अस्तित्वाचे ! आपल्या   पुर्वजांच्याहि  पुर्वजांचे  !

 नक्षत्र  - तारकांसहित   आपल्या  खर्या   पुर्वजांचे  !


हायड्रोजनचे !


होय  मित्रांनो  तोच  अति 🔥 ,    विस्फोटक   हायड्रोजन  वायु
ज्याचे  अग्निच्या  साक्षीने  हवेशी  मिलन  होताच  बनते  पाणी !
आहे  की नाहि  चमत्कार  एक  ज्वालाग्राहि  हायड्रोजन  वायु  आणि  दुसरी  ज्वलनास  सहाय्य  करणारी  हवा   जिच्यातील  प्राणवायुशिवाय  जंग जंग पछाडूनहि  हायड्रोजनच  काय  जगातले  कुठलेच  ईंधन  जळू  शकत  नाहि.   { म्हणून  तर  चक्क   मिथेन  नावाच्या  ज्वालाग्राहि   ईंधनानेच  बनलेला  शनीचा  चंद्र  टायटन  अजुन  जळला  नाहि. कारण  तिथे  हवा  तर  आहे पण  त्या  हवेत  "प्राणच"  नाहित     आणि   ह्याच  कारणासाठी  गाडीच्या  ईंजिनमधील  सिलिंडरमध्ये  टर्बो  चार्जर्सद्वारे  क्षमतेहून  बरीच  जास्त  हवा  कोंबतात.  ज्यामुळे  ईंधनास  जळण्यास  अधिकाधीक  ऑक्सिजन  मिळून  गाडीची  शक्ती  ( स्पीड )  वाढतो ( आणि  डोक्यात  जातो ) }
तर  अश्या ह्या  ज्वालाग्राहि  हायड्रोजन  आणि   ज्वलनास  मदत  करणार्या  हवेसोबत  तिसरा  असतो   साक्षात  अग्नि !   आणि  हे  तिघे  एकत्र  येऊन  बनवतात  पाणी  !
ते  पाणी  जे  प्रलयाग्निलाहि  शांत  करून  विश्वाची  तृष्णा  क्षमवत  आणि  आपल्या  शरीरातुन  तर  जे      रक्त  म्हणून  सळसळत  तेच  जीवन , पाणी , H2O !  ज्यात  हायड्रोजनची  स्फोटक  क्षमताहि  असते  आणि  ज्यात  आपल्या  सर्वांचा  श्वास  असणार्या  हवेचा  "जीवनदायी"  अंशहि  असतो.  असो  आत्ता  हायड्रोजनपुराण  पुरे !
मुळ  गोष्टीकडे  वळूया.



तर  मित्रांनो  हि  गोष्ट  ऐकुन  आत्तापर्यंत  आपल्या  सर्वांना  आत्तापर्यंत  अनेक  प्रश्न  पडले  असतील  आणि  त्यातला  सर्वात  महत्वाचा  म्हणजे  ब्रम्हांडाची    सुरूवात  आणि  हायड्रोजनबद्दल  मी  ईतक्या  ठामपणे  कस  बोलतोय ?

मित्रांनो  त्याच  ऊत्तर  दडलय  आपल्यासकट  , ग्रह ,  तारे  हे  सर्व  सजीव - निर्जीव   विश्व  बनवणार्या  मुलद्रव्यांच्या  आवर्तसारणीत  किंवा  पिरीऑडीक  टेबलमध्ये  !

अहं  घाबरू नका  मित्रांनो  मी  "शाळा" घेत  नाहि . फक्त  आठवण  करून  देतोय  की  हि  विश्व  घडवणारी   हि  मुलद्रव्य  बनली  आहेत  अणूंपासून !  जो  प्रोटॉन , न्युट्रॉन  आणि  ईलेक्ट्रॉनपासून  बनतो  (म्हणजे  थोडक्यात  हे  ब्रम्हांड  घडते  ह्या  अणूंपासून !)
पण  आपल्याला  माहितेय  का  मित्रांनो  ब्रम्हांड  घडवणार्या  ह्या  सर्व  सर्व  अणूंची  अंतर्गत  रचना  एकसारखीच  असते.  फक्त  एक  गोष्ट   सोडून .  त्या  अणूंमधल्या   प्रोटॉन्सची  संख्या !   होय  मित्रांनो     एखादा  अणू  कुठले  मुलद्रव्य  बनवणार  हे  ठरवते  अणूमधल्या  प्रोटॉन्सची  संख्या  !

फक्त  अणूमधील  प्रोटॉन्सची  संख्या  बदलून  त्याच  अणूंपासून   बनते  एकदम  भिन्न  स्वभावाचे   दुसरे  मुलद्रव्य  !  
अणूंमधल्या  प्रोटॉन्सची  संख्या  जसजशी  वाढत  जाते  तसतसे  अणूचे ( आणि  त्या  अणूपासून  बनणार्या  नविन  मुलद्रव्याचे  ) वजन  वाढत  जाते

 मित्रांनो  म्हणूनच  तर  ब्रम्हांडाची  सुरूवात  करणारा  हायड्रोजन  जगातले  सर्वात  हल्के  मुलद्रव्य  आहे   ईतके  हल्के  की  त्याला  अतिप्रचंड   फुग्यात  भरून  मानवाने  सर्वप्रथम  ( विमानाआधी )  आकाशात  झेप  घेऊन  यशस्वी  ऊड्डाण  केले.  तर  अश्या  ह्या   हायड्रोजनच्या  अणूमध्ये  असतो  फक्त  एक   प्रोटॉन  आणि  एक  ईलेक्ट्रॉन  आणि  ह्यात  जेंव्हा  एक  ईलेक्ट्रॉन  जोडला  जातो  तेंव्हा  बनते  नविन  पुर्णत:  भिन्न  मुलद्रव्य  हिलीयम !

आणि  अश्याप्रकारे  प्रोटॉन्सची  संख्या  वाढत  जाऊन  जगातल  सर्वात  जड  मुलद्रव्य  बनत   जे  खरच  "भारी" असते  आणि   ह्या  भारी  मुलद्रव्यासोबतच  बनतो  " लय  भारी "  आपण !    तुम्ही , मी  आणि  आपले  खरे  पुर्वज !


पण  मग   आपल्या  सर्वांना  घडवणार्या  ह्या    मुलद्रव्यांना   नक्की  कोण  बनवत  कोण  ?  ती  चमत्कारातुन  घडतात ?   आणि    आपले  खरे  पुर्वज  कोण  ?


मित्रांनो  ह्या  सर्व  ऊत्तरांसहित  ऊद्या  आपली  भेट  होईल.
मन:पुर्वक  धन्यवाद !


क्रमश:



- मकरंद  सुधाकर  पाटोळे कदम.